दुबईच्या वाळवंटात मिरॅकल गार्डन फुलले त्याचप्रमाणे न्हावे खाडी येथील चिखलमय जमिनीवर भव्य दिव्य आणि महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर पडणारी रामबाग फुलली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हि अद्भुत संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. १४ एकर जागेतील या रामबागेत विविध प्रकारची फुलझाडे, तलाव, विद्युत रोषणाई, पदपथ, चिरेबंदी बांधकाम, आसन व्यवस्था, खेळणी, पाळणे, डबल हर्ट आणि स्टोन असे दोन सेल्फी पॉंईंट, मचवा, पाण्याचे कारंजे, अशा सर्व बाबी निसर्गप्रेमींना आकर्षित करत आहेत.
सायकांळी या उद्यानाचे रूप बदलते, त्यावेळी असणारी विद्युत रोषणाई अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटणारी असते, त्याचबरोबर वाहन पार्किंग, सुरक्षा अशा विविध पायाभूत सुविधा या ठिकाणी असल्याने हजारो नागरिक भेट देऊन मनमुराद आनंद घेत आहेत. त्यामुळे 'रामबाग' च्या निमित्ताने एक आकर्षण व महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर पडली आहे.
Tags
पनवेल