खुटारी येथील श्री चैतन्यश्वर मंदिर येथे होणाऱ्या या कार्यक्रमात सायंकाळी ०४ वाजता 'हळदी कुंकू' समारंभ, त्यानंतर 'खेळ पैठणीचा', तसेच मनोरंजक स्पर्धा होणार आहेत. या समारंभाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन समारंभाचे आयोजक माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे, माजी सदस्य विलास म्हात्रे, तळोजा मध्यवर्ती कारागृह अशासकीय अभ्यागत मंडळ सदस्या लीना म्हात्रे, महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा सविता म्हात्रे यांनी केले आहे.
Tags
पनवेल