मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर घेऊन आरोग्यदिन होणार साजरा; 2डी ईको, अँजोग्राफी व अँजोप्लास्टीच्या करण्यात येणार मोफत चाचण्या





पनवेल दि.०७(संजय कदम): शुश्रुषा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल पनवेल तथा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधी यांच्या संयोजनाने शुश्रुषा हॉस्पिटल, ५ वा माळा, जुना पोस्ट ऑफिस जवळ जुने पनवेल येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.


दिनांक ९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत. ५० वय वर्ष च्या पुढील व्यक्तीनी शिबिरामध्ये बीपी, शुगर, 2डी इको, अँजोग्राफी, एन्जोप्लास्टी ह्या चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. शिबिराला येताना पिवळे व केशरी राशन कार्ड घेऊन येणे असे आवाहन वैद्यकीय कक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख रुपेश पाटील यांनी केले आहे ह्याबाबत अधिक महिती व संपर्क करीता रुपेश पाटील 9820707303, रोशन पवार 8433856780, प्रसाद सोनावणे 7208224242, अर्जून परदेशी 9664848484, तौफिक बागवान 8898929702, अभिजीत साखरे 9322775010, कुमार लोंढे 7030279188 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

थोडे नवीन जरा जुने