लाईफ केअर असोसिएशनचा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन साजरा


पनवेल दि.२६ (वार्ताहर) : लाईफ केअर असोसिएशनचा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन नुकताच वॉरीअर फाऊंडेशन पळस्पे फाटा, पनवेल इथे साजरा करण्यात आला. यावेळी दिव्यांगांना तिन चाकी सायकलींचे वाटप करण्यात आले.
यावेळी वॉरीअर फाऊंडेशनच्या मुलांनी योगा डान्स सादर करत व वैदीक मंत्र म्हणत लोकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनतर वॉरीअर फाऊंडेशनचे अधिपती विष्णू गौतम यांनी फाऊंडेशनची माहिती दिली. यावेळी लाईफ केअर संस्थेच्या संस्थापकांच्या हस्ते वॉरीअर फाऊंडेशनला मुलांच्या प्रगतीकरीता 11 हजार रुपयांचा चेक देण्यात आला. यावेळी सचिवपदी सुरेश बाबू, सहसचिवपदी एकनाथ चिरके, व सहखजिनदारपदी दिपक कराळे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच कॅप्टन तलवार यांना लाईफ केअर असोसिएशनचा गौरव पुरस्कार देवून गौरवण्यात आले. यावेळी श्री. नाले, संजय जाधव, दिपक कानाबार, श्री. पवार, सुरेश बाबू, श्री. कदम, शिंदे व एकनाथ चिरके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. थोडे नवीन जरा जुने