होळीच्या रंगांनी सजल्या पनवेलच्या बाजारपेठा





पनवेल दि.२६ (वार्ताहर) : पनवेल परिसरातील बाजारपेठ होळीच्या रंगांनी सजल्या असून रंगपंचमीनिमित्त रंग-पिचकारी घेण्यासाठी ग्राहकांचीही लगबग सुरू झाली आहे. कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे सर्व प्रकारच्या रंगाच्या दरात सुमारे दहा टक्के वाढ झाली आहे.



विविध प्रकारचे नैसर्गिक रंग, लहानग्यांचे आकर्षण असणाऱ्या पिचकाऱ्यांनी पनवेल परिसरातील बाजारपेठ फुलली आहे. या खरेदीसाठी ग्राहकांची व लहानग्यांची झुंबड उडाली आहे. सद्य बाजारात रंग, पिचकाऱ्यांचे दर तेवढेच असून, नैसर्गिक रंगाला अधिक मागणी आहे. नैसर्गिक सुखे रंग ८० ते १०० रुपये, ओले रंग १८० रुपयांवर उपलब्ध आहेत. १९० ते ५०० रुपयांपर्यंत बाजारात विविध प्रकारच्या पिचकाऱ्या उपलब्ध असून, यामध्ये विविध कार्टून्सच्या पिचकाऱ्यांची क्रेझ लहान मुलांमध्ये आहे. यंदा पब्जी या खेळाची पिचकारी असून लहानम्यांमध्ये याची अधिक क्रेझ आहे. 



विविध डिझाइनच्या पिचकारी ८० ते ४५० रुपयांवर, तर पब्जी पिचकारी १९० ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. कलरसाठी मिनी थंडर व भंडर अशा दोन प्रकारच्या स्प्रेला ग्राहकांकडून मागणी असल्याचे व्यापायांनी स्पष्ट केले. हॅपी होली लिहिलेल्या वैविध्यपूर्ण पिवळ्या रंगाची टोपी, छुमंतर जादू कलर हा नवीन अँण्ड आला आहे. पिचकारीमध्ये टाकण्यासाठी परफ्युम लिक्विड रंग उपलब्ध आहे. रासायनिक रंग म्हणून ओळखला जाणारा भैया रंग हा दोन-तीन दिवस शरीरावर तसाच राहतो. त्यामुळे या रंगाला मागणी कमी आहे.




थोडे नवीन जरा जुने