पनवेल दि. ०५ ( वार्ताहर ) : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या इको व्हॅन चालकांवर खारघर वाहतूक शाखेने कारवाई करीत त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. खारघर वाहतूकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
खारघर रेल्वे स्टेशन ते तळोजा यादरम्यान हे व्हॅनचालक प्रवासी करतात. स्टेशनवरून वाहतूक तळोजाकडे जाणारी बससेवा अपुरी आहे. इतर प्रवासी सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते. याचा फायदा हे व्हॅनचालक घेत असतात. मनमानी भाडे उकळतात. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवतात. वाहतुकीचे नियम पाळत नाहीत.अश्या पन्नास चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे मनमानी, दादागिरी व बेशिस्त वर्तन बिलकुल खपवून घेण्यात येणार नाही अशी सक्त ताकीद त्यांना खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश गावडे यांनी दिली आहे.
Tags
पनवेल