मालमत्ता कराविरोधातली पहिली न्यायालयीन लढाई परिवर्तन सामाजिक संस्थेने जिंकली






मुंबई उच्च न्यायालयाने पनवेल महापालिकेचा दावा फेटाळून लावत महादेव वाघमारे यांना याचिकाकर्ते म्हणून धरले ग्राहय 
पनवेल दि. २१ (संजय कदम) : महादेव वाघमारे हे करदाते नाहीत त्यामुळे त्यांना मालमत्ता करा बाबत न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार नाही तसेच काही हरकती असल्यास महापालिका आयुक्तांकडे गेले पाहिजे अश्या दोन हरकती पनवेल महानगरपालिकेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात घेण्यात आल्या होत्या. यावर न्यायालयाने पनवेल महापालिकेला चपराक लावली असून १३५ कोटी जनतेमधून कोणीही न्यायालयात धाव घेऊन न्याय मागू शकतो असा सांगत महादेव वाघमारे यांना याचिकाकर्ते म्हणून ग्राहय धरले. 



पनवेल येथील मालमत्ता कराविरोधात परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने महादेव वाघमारे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वाघमारे हे करदाते नाहीत त्यामुळे त्यांना मालमत्ता करा बाबत न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार नाही. तसेच मालमत्ता करा काही हरकती असल्यास महापालिका आयुक्तांकडे गेले पाहिजे अशा दोन हरकती पनवेल महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात घेतल्या होत्या. यासंदर्भातील सुनावणी उच्च न्यायालयात पार पडली. व्यापक जनहित असल्याने महादेव वाघमारे पनवेलमधील करधारकांच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करू शकतात. यामध्ये कोणत्याही कायद्याच किंवा नियमांचे उल्लंघन होत असेल तर कलम २२६ नुसार १३५ कोटी जनतेमधून कोणीही न्यायालयात धाव घेऊन न्याय मागू शकतो. 



असा युक्तिवाद याचिकाकर्त्याचे वकील ऍड विजय कुर्ले यांनी न्यायालयात केला. त्याचबरोबर या प्रकरणाशी सुसंगत असलेले सर्वोच्च न्यायालयाचे काही जजमेंट सुद्धा त्यांनी सादर केले. याचिकाकर्त्यांच्या वकिलांचे म्हणणे विचारात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने पनवेल महापालिकेचा दावा फेटाळून लावत महादेव वाघमारे यांना याचिकाकर्ते म्हणून ग्राहय धरले. त्यामुळे परिवर्तन सामाजिक संस्था आणि पनवेलकरांनी मालमत्ता कराविरोधातली पहिली न्यायालयीन लढाई जिंकली आहे.



थोडे नवीन जरा जुने