तरुणी बेपत्ता





पनवेल दि. २१ (वार्ताहर) : पनवेल शहरातील कोळी वाडा येथून कामाला जाते असे सांगून घरातून बाहेर गेलेली तरुणी कोठेतरी निघुन गेल्याने ती हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. 



शिवाणी वाघरी असे या तरुणीचे नाव असून तिचे वय २३ वर्ष, रंगा सावळा, उंची ५ फुट २ इंच, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, केस काळे व लांब, उजव्या हाताच्या पिढरीवर इंग्रजी मध्ये शिवाणी हे नांव गोदलेले आहे. तसेच अंगामध्ये लाल रंगाचा टॉप, काळ्या रंगाची ओढणी, सफेद रंगाची जिन्स पॅन्ट परिधान केलेली आहे. सदर तरुणीला हिन्दी, गुजराती, मराठी येत असून तिच्याबद्दल कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस हवालदार संदेश पाटील यांच्याशी संपर्क साधावा.




थोडे नवीन जरा जुने