शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तळोजा शहर शाखेतर्फे केंद्रीय निवडणूक आयोगाचा निषेध





शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तळोजा शहर शाखेतर्फे केंद्रीय निवडणूक आयोगाचा निषेध 
पनवेल दि. २१ (संजय कदम) : शिवसेना पक्ष व चिन्ह या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तळोजा शहर शाखेतर्फे निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात भगवा घेऊन उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.


 
यावेळी जिल्हासल्लागार बबनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपमहानगर प्रमुख कैलास पाटील, शहर प्रमुख महेश भोईर, तळोजा शहर प्रमुख प्रदीप केणी, विभाग प्रमुख मिथुन मढवी, शाखाप्रमुख जगदीश मढवी, कुंदन मुंबईकर, अभिमन्यू गोरे, वासुदेव मढवी, विजय सांगडे, जनार्दन सांगडे, हर्ष धोत्रे, पंकज कदम, विनायक सूरज गाडे, शुभम निघूकर, तुषार म्हात्रे तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्रीय निवडणूक आयोगाचा निषेध व्यक्त केला.



थोडे नवीन जरा जुने