शिवशक्ती मित्र मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी

पनवेल दि. २१ (संजय कदम) : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पनवेल शहरातील लाईन आली येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले शिव शक्ती मित्र मंडळाकडून मिरवणूक सहभागी झालेल्या भाविकांसाठी सरबत चे वाटप करण्यात आले. माजी नगरसेवक व शिवशक्ती मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष रमेश गुडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे पदाधीकारी व सदस्यांनी सामाजिक बांधिलकी जपत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मिरवणूक सहभागी झालेल्या भाविकांना सरबत चे वाटप केले. तसेच पनवेल महापालिकेच्या मार्फत ‘स्वच्छ पनवेल-सुंदर पनवेल’ ठेवण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत रिकामे ग्लास टाकण्यासाठी मंडळानी डस्टबिनची व्यवस्था केली होती. परंतु काही लोकांनी ग्लास रस्त्यावर टाकून दिल्याचे मंडळाच्या सदस्यांना लक्षात येताच त्यांनी स्वतः ग्लास उचलत परिसर स्वच्छ केला. त्यामुळे नागरिकांनी शिवशक्ती मित्र मंडळाच्या सदस्यांचे कौतूक केले. 


कोट - पनवेल महापालिका आपल्या पनवेल शहराला स्वच्छ राखण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. यामध्ये आमचाही सहभाग व्हावा यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित मिरवणूकीत ठिकठिकाणी डस्टबिन ठेवले होते. तसेच परिसरात पडलेला कचरा कसलाही विचार न करता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः उचलला आहे. - रमेश गुडेकर (संस्थापक अध्यक्ष, शिवशक्ती मित्रमंडळाचे)


थोडे नवीन जरा जुने