महिलेवर बलात्कार करून पसार झालेल्या वाकड्याच्या पनवेल शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या



पनवेल दि. ०२ ( संजय कदम ) : पनवेल परिसरात एका महिलेला मारहाण करून बलात्कार केल्यावर तिला धमकी देणाऱ्या दोन आरोपी पैकी एका आरोपीला पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने अवघ्या काही तासात ताब्यात घेतले होते . त्यां नंतर पसार झालेल्या दुसऱ्या आरोपीला मध्यरात्रीच्या सुमारास नवीन पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे .  


             तक्रारदार पिडीत महिलेने तिच्यावर अनोळखी दोन इसमांनी बलात्कार केल्याची खबर पनवेल शहर पोलीस ठाण्यात तीन दिवसापूर्वी दिली होती. तिने दिलेल्या माहिती नुसार, सदरची पिडीत महिला ही ऑरीयन मॉल समोरील हॉटेल मधून रात्री १:३० ते ०२:०० वा च्या दरम्यान बाहेर पडली व करंजाडे येथे घरी जाण्यासाठी रिक्षा पाहत असताना अनोळखी दोन इसमांनी रिक्षात बसवतो असा बहाणा करुन ओरियन मॉल च्या मागे घेऊन जाऊन, तू आमच्याबरोबर चल नाही तर तुला मारू असे धमकी देऊन सदर महिलेला रेल्वे स्टेशनच्या जवळील नवीन पनवेल हद्दीतील एका पडक्या इमारतीच्या टेरेसवर नेऊन हाताने मारहाण केली व बलात्कार केला व  सदर प्रकार कोणास सांगितला तर जीवे ठार मारू अशी धमकी देऊन नंतर सदर दोघे अनोळखी आरोपी तेथून गेले होते . 


या तक्रारीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मागर्दर्शनाखाली   पो.नि. प्रमोद पवार(गुन्हे), सपोनी. गणेश दळवी ,  पो. उप.नि. अभयसिंह शिंदे सह  तात्काळ कार्यवाही गुन्हे शोध पथकाची दोन पथके तयार करून सदर घटना घडलेल्या परिसरातील  सी.सी.टी.वी. फुटेज  तपासले असता एका खाजगी  सी.सी.टी.वी. मध्ये दोन इसम सदर पीडित  मुलीसोबत जाताना दिसून आले असून सदर इसमा बाबत  गुप्त बातमीदारांकडून माहिती काढुन सदरचा गंभीर गुन्हा  आरोपी नामे अविनाश साहेबराव चव्हाण, वय 20 वर्ष, धंदा बेकार, रा. पंचशील नगर झोपडपट्टी, नवीन पनवेल व सुरज मारुती देवडे उर्फ वाकड्या वय 22 वर्ष रा. पंचशील नगर झोपडपट्टी नवीन पनवेल यांनी केल्याचे निष्पन्न झाले.सदर आरोपी गुन्हा करून पळून गेल्याने त्यांचा कशोशिने शोध घेतला असता आरोपी अविनाश चव्हाण याला अवघ्या 12 तासाच्या आत मध्ये गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली होती . तर त्याच्या सहकारी पसार झाल्याने त्याला मध्यरात्रीच्या सुमारास नवीन पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे .



थोडे नवीन जरा जुने