पनवेल दि.०१ (संजय कदम) : शहरातील शिवाजी चौक येथील फुटपाथलगत रस्त्यावर आपली सायकल पार्किंग ला लावून नाष्टा करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याला नाष्टा महागात असून अज्ञात इसमाने त्याची सायकल चोरून नेली. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
करंजाडे येथील सुरजकुमार मीना हा विद्यार्थी शहरातील आंबेडकर पुतळा ते शिवाजी चौक कडे जाणान्या रोडवर रायगड वडापाव सेंटर या दुकानाचे समोर फुटपाथलगत रस्त्यावर आपली सायकल लावून नाष्टा करायला गेला. मात्र सुरज नाष्टा करत असताना अज्ञात इसमाने त्याची ५ हजार रूपये किंमतीची हिरव्या व काळया रंगाची हारक्युलीस सायकल चोरून नेली. या चोरीबाबत सुरज याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Tags
पनवेल