पनवेल दि.०१ (संजय कदम) : कंपनी साईट मध्ये प्रवेश करुन साईटवर असलेल्या कंटेनर कॅबीनांपैकी एका कॅबीनची कडी कोयंडा तोडून कॅबीन मधील आणि कॅबीनच्या बाहेरील बाजुस शेजारी उघडयावरील साईटवर असलेला २ लाख ९४ हजार १०० रूपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्टलींग अँड विल्सन प्रा. लि. कंपनीच्या सिमरन मोटर्स शेजारी असलेल्या साईट मध्ये प्रवेश करुन साईटवर असलेल्या कंटेनर कॅबीनांपैकी एका कॅबीनची कडी कोयंडा तोडून कॅबीन मधील आणि कॅबीनच्या बाहेरील बाजुस शेजारी उघडयावरील साईटवर असलेले ८१ हजार रुपये किमतीची कॉपर पट्टी, २० हजार रुपये किमतीचे हॉर्न गॅप फ्यूस सेट, ५० हजार रुपये किमतीचे लाइटेनिंग ॲरेस्टर सेट, ६० हजार रुपये किमतीचे बस पोस्ट इंसुलेटर सेट, ६ हजार रुपये किमतीचे फाऊंडेशन बोल्ट, ४० हजार रुपये किमतीचे ट्रान्सफॉर्मर, २७ हजार सहाशे रुपये किमतीचे एम. एस. चॅनल, ९ हजार रुपये किमतीचे ट्रान्सफॉर्मर व्हॉल्व असा एकूण २ लाख ९४ हजार १०० रूपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.