पनवेल दि.०१ (संजय कदम) : तालुक्यातील उसर्ली गावात कंपनीचे गोडावूनचे व गोडावूनमधील कंटेनरचे लॉक अज्ञात चोरटयाने तोडून गोडावूनमध्ये प्रवेश करून ८६ हजारांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस अज्ञात चोराचा शोध घेत आहेत.
उसर्ली ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मैदानातील कंपनीचे गोडावूनचे व गोडावूनमधील कंटेनरचे कोणीतरी अज्ञात चोरटयाने लॉक तोडून गोडावूनचे आत प्रवेश करून १० हजार रूपये किं.च्या बॅट-या, १५ हजार रूपये किमतीचे केव्ही जनरेटर, २४ हजार रुपये किमतीचे कन्वेयींग मोटार, १२ हजार रुपये किमतीचे हॅण्डब्रेकर, ५ हजार ३५० रुपये किमतीचे एमएस रॉड, ५ हजार रूपये किमतीचे वेईंग मशिन, ५ हजार रुपये किमतीचा वॉटर पंप, ८ हजार रुपये किमतीचा एअर कंप्रेशर, २ हजार १०० रुपये किमतीचा स्टील सीव असा एकूण ८६ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहे.
Tags
पनवेल