पाताळगंगा : २२ फेब्रुवारी, खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत माणकीवली हद्दीमध्ये खडी मशीन मोठ्या प्रमाणावर दगड उत्खनन करत असून या खडीचे उत्पादन करताना मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरत असुन अनेकांना आजार ही जडत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.या खडी मशीन मालकांवर नियंत्रण व नियम लावणे गरजेचे आहे, त्यामुळे संबंधित प्रशासन काय कारवाई करणार याकडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे.
खालापूर तालुक्यात माणकीवली ग्रामपंचायत अनेक कारणाने बहुचर्चित असुन तालुक्यातील सर्वाधिक खडी मशीन या माणकीवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असून या दगड खाणींमुळे धुळीचे साम्राज्य पसरल्याने परिसरातील नागरिक व लहान मुले धुळीमुळे त्रस्त झाले आहेत. या धुळीमुळे परिसरातील नागरिकांचा श्वास कोंडला जात आहे. हा भयंकर व जीवघेणा त्रास नागरीक सहन करावा लागत असून याकडे संबंधित प्रशासन मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची खंत या भागातील नागरीक करीत असल्याने तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
या ठिकाणी डोंगराळ भागाला सुरुंग लावण्याचे प्रकार नेहमीच सुरू असल्याने यामुळे जमिनीला हादरे बसत आहेत. त्यामुळे या परिसरातील अनेक घरांना हादरा बसत असल्यामुळे घरातील भांडी पडणे, विद्युत उपकरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका उद्भवत आहे. तसेच खडीचे उत्पादन करत असताना या परिसरात धुळीचे साम्राज्य पसरत असून येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे या परिसरात साधनसंपत्ती नष्ट झाली काय किंवा राहिली काय, याचे कोणालाही सोयरसुतक नसल्याचे वास्तव्याचे चित्र सध्या या ठिकाणी दिसून येते.
Tags
पाताळगंगा