ओव्हर लोड वाहतूक ठरत आहे प्रवासी वर्गांसाठी धोकादायक






काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : २३ फेब्रुवारी , सावरोली - खारपाडा या रस्त्याचे काम उत्तम प्रकारे झाल्यामुळे प्रवासी वर्ग समाधान व्यक्त करीत आहे.मात्र या मार्गावर शेकडो असे कारखाने निर्माण झाल्यामुळे काही नविन कारखाने काम सुरु आहे.यामुळे या कारखान्यासाठी लागणारे कच्चे तसे तयार झालेला माल वहानामध्ये वाजवी पेक्षा मोठ्या प्रमाणात म्हणजे ओव्हार लोड भरला जात असल्यामुळे शिवाय जे वाहन चालक अतिषय वेगाने वहान चालवित असल्यामुळे अपघाताची समस्या नाकारु शकत नाही. यामुळे काही वेळा वळावरील नियंत्रण सुटल्यामुळे अनेक वेळा या मार्गावर ह्या वोव्हर लोड भरलेल्या गाड्या पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे प्रवासी वर्गावर वहान चालवितांना तांगती तलवार निर्माण झाली आहे.



                   मात्र या वाहन चालकांस आणी येथिल कारखानदारी व्यवस्थापक यांना कोणतेहे भय राहिले नाही.वहानाची क्षमते पेक्षा जास्त माल फरणे हेच सुत्र ते पालत आहे.परिणामी या मार्गावर अनेक वेळा अपघात काही जीवघेणी ठरत असून काही किरकोळ स्वरुपात तर काहिंना अपगंत्व येण्याची वेळ निर्माण झाली आहे. वहानामध्ये ओव्हर लोड वाहतूक करीत असल्यामुळे वळणार ह्या वहनांचा काही भाग झुकल्यासारखे वाटत असतो काही वेळा हे वहान पडत की काय असा प्रश्न निर्माण होत असतो. शिवाय समोरुन येणारे वहान अतिषय वेगाने येत असल्यामुळे वाहन चालकांचे नियंत्रण सुटल्यामुळे मोठे अपघात घडत आहे.


             परिणामी या रस्त्यावर वहान चालकांच्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.या मार्गावर अनेक गावे शाळा विद्यालय जोडले गेले आहे.मात्र यांचा विचार कोणीच करीत नाही उलट आपल्याला नियोजित वेळेवर कसे पोहचता येइल याचाच विचार प्रत्येक वहान चालक करीत आहे.यामुळे आपल्याला आपघाताला निमंत्रण मिळत आहे.मात्र गेले अनेक वर्षे या मार्गावर ओव्हर लोड वाहतुक जरी होत असली तरी सुद्धा या वहानवर कारवाई होवून सुद्धा मात्र जसे ते स्थिती आजही निर्माण आहे.कारण यांचे धागे दोरे वर पर्यंत असल्याची चर्चा प्रवासी वर्ग करीत आहे 





 
थोडे नवीन जरा जुने