कोकणात जाण्यासाठी ज्यादा बसेसची व्यवस्था.





उरण दि २३(विठ्ठल ममताबादे )होळी सणा निमित्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सालाबाद प्रमाणे कोकण वासी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ज्यादा गाड्या सोडण्यासंदर्भातील निवेदन कोकण वासीय उत्कर्ष संस्था, उरण या संस्थेचे कार्याध्यक्ष नंदकुमार साळवी आणि कार्यकारिणी सदस्य संतोष पवार यांनी एस टी महामंडळाचे आगार प्रमुख व्ही.एन.वारघडे यांना दिले. सदरहू निवेदन आगार प्रमुख व्ही. एन.वारघडे यांनी संबंधित विभागातील रामनाथ म्हात्रे मोबाईल नंबर



 ९३२६३९५५२९ यांना ॲडव्हान्स बूकींग करण्यासंदर्भात सुचना दिल्या आहेत. सालाबादप्रमाणे होळी सणा निमित्त कोकणात जाण्यासाठी जसे रत्नागिरी (रातराणी), माणगाव - महाड - पोलादपूर - खेड ), दाभोळ - दापोली, , देवरुख, कणकवली या ठिकाणी राहणाऱ्या कोकणवासीयांनी या संधीचा लाभ घ्यावा.रामनाथ म्हात्रे यांच्याशी संपर्क साधून ऍडव्हान्स बुकिंग करून घ्यावे असे आवाहन कोकणवासीय उत्कर्ष संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


थोडे नवीन जरा जुने