प्रामाणिकपणे सोन्याची वस्तू परत करणाऱ्या शिवसैनिकांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी केले कौतुक
पनवेल दि.१४ (संजय कदम): प्रामाणिकपणे सोन्याची वस्तू परत करणाऱ्या शिवसैनिकांचे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी कौतुक केले आहे.


           पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे संध्याकाळी फेरफटका मारत असताना शिवसैनिक राकेश टेमघरे यांना सोन्याची मौल्यवान वस्तू रस्त्यावर पडलेली सापडली. सदर सोन्याची वस्तू सापडल्यानंतर राकेश टेमघरे यांनी त्वरित पनवेल शहर पोलीस स्टेशन गाठत सदरची सोन्याची वस्तू पनवेल शहर पोलिसांच्या स्वाधीन केली व त्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने व पोलीस निरीक्षक (क्राईम) प्रमोद पवार यांनी शिवसैनिक राकेश टेमघरे, रोहित टेमघरे, संकेत बुटाला आणि अमर पटवर्धन यांनी थोडे नवीन जरा जुने