पनवेल दि.१४(वार्ताहर): उघड्यावर कचरा जाळणे हा पर्यावरण संरक्षण कायदा आणि भारतीय दंड विधानानुसार गुन्हा आहे. त्यासाठी कठोर दंडात्मक तरतूद करण्यात आली आहे. मात्र, सेंट्रल पार्कच्या मोकळ्या भूखंडावर कचरा टाकून जाळला जात आहे. त्यांच्यावर कोण कारवाई करणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
खारघर परिसरातील गावे आणि वसाहतीमधील घनकचरा पालिकेकडून उचलला जातो. तो कचरा सिडकोने राखीव ठेवलेल्या खारघर कार्पोरेट पार्कच्या भूखंडावर एकत्र केला जातो. त्यानंतर तो कचरा घोट येथील डम्पिंगमध्ये आणला जातो. गाव आणि वसाहतीमधील नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल पार्क भाग दोनसाठी राखीव असलेल्या जागेवर टाकून पसार होतात. काही दिवसांनंतर सकाळ किंवा दुपारच्यावेळेस हा कचरा पेटवला जातो. त्यामुळे प्रदूषण तर होतेच; शिवाय जवळपास असणाऱ्या झाडांनीही इजा होत आहे. तळोजा एमआयडीसीमधून सोडल्या जाणाऱ्या रसायनयुक्त उग्रवासामुळे नागरिक त्रस्त असताना आता खारघर परिसरात मो
कोट :-
पनवेल महापालिकेकडे कचरा वर्गीकरणासाठी मोठ्या प्रमाणात जागा आहे. तरीही पालिकेकडून कचरा जाळला जात नाही. मात्र, बाहेरील व्यक्ती कचरा टाकून जाळत असेल, तर अशा व्यक्तींवर कारवाई केली जाईल- डॉ. वैभव विधाते, सहायक आयुक्
Tags
पनवेल