मोबाईल साठी लोको पायलटवर जीवघेणा हल्ला करणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात

पनवेल दि. १४ ( वार्ताहर ) : रेल्वे स्थानक परिसरात मोबाइलवर बोलत उभ्या असलेल्या लोको पायलटवर गर्दुल्ल्यांकडून मोबाइलचोरीसाठी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सदर इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.                 अजनीकुमार रमाशंकर बिंद (३०) हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये लोको पायलट मॅनेजर म्हणून काम करतात. पनवेल रेल्वे स्थानकात ते ड्युटीवर होते. रात्री जेवण झाल्यानंतर साडेदहाच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १ येथे पोलिस चौकीबाहेर फोनवर बोलत उभे होते. नशेत असलेल्या चोरट्याने लोकोपायलट बिंद यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तोंडावर नाकावर जोरदार ठोसे मारले. बिंद यांनी आरडाओरड केल्यामुळे ड्युटीवर असलेले लोहमार्ग पोलिस, आरपीएफ पोलिस धावून गेले. इजाज सलिम शेख (२३) असे हल्लेखोराचे नाव आहे. स्थानकाजवळील नवनाथ नगर झोपडपट्टीत तो राहतो. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून मोबाइलचोरी करून चोरीसाठी जबरी मारहाण केल्याप्रकरणी पनवेल लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बिंद यांना जबर मारहाण झाल्यामुळे प्राथमिक उपचारानंतर त्यांना खांदा कॉलनीतील अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. झटापटीत झुडपांमध्ये फेकून दिलेला १५ हजार रुपये किंमतीचा मोबाइल सापडला आहे.


थोडे नवीन जरा जुने