पनवेल दि. १४ ( संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील कसालखंड गावाच्या कमानीजवळील एका बंद रूम जवळ इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहे.
सदर इसमाचे अंदाजे वय चाळीस ते पंचेचाळीस वर्षे, रंगाने गव्हाळ, डोक्याचे व दाढीचे केस वाढलेले असून अंगात गुलाबी रंगाचा फुल शर्ट व तपकिरी रंगाची फुल पॅन्ट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे दूरध्वनी ०२२-२७४५२४४४ किंवा पोलीस हवालदार अमर भालसिंग यांच्याशी संपर्क साधावा.
Tags
पनवेल