पोलिसांना घाबरून किंवा कारवाई टाळण्यासाठी हेल्मेट न वापरता "आपल्या स्वतःच्या जीवासाठी" हेल्मेट घाला -- व.पो.नि. संजय पाटील









पोलिसांना घाबरून किंवा कारवाई टाळण्यासाठी हेल्मेट न वापरता "आपल्या स्वतःच्या जीवासाठी" हेल्मेट घाला -- व.पो.नि. संजय पाटील 

हेल्मेट न घालणाऱ्यांकडून पोलिसांची दंडवसुली....

पनवेल शहर वाहतूक पोलिसांची धडक कारवाई मोहीम

पनवेल/प्रतिनिधी -- दुचाकी वाहन चालविताना डोक्यावर हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर वाहतूक शाखेचे व.पो.नि संजय पाटील यांच्यासह वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पनवेल परिसरातमध्ये हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरु केली आहे. यावेळी पोलिसांना दाखविण्यासाठी किंवा कारवाई पासून वाचण्यासाठी हेल्मेट न घालता आपल्या जीवासाठी हेल्मेट घाला असे आवाहन संजय पाटील यांनी पनवेलकरांना केले आहे.



हेल्मेट सक्तीचा विषय सध्या राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये गाजत आहे. पनवेल शहारासह तालुक्यातही हेल्मेट घालणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये वाहतूक नियम मोडणाऱयांच्या दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करीत नाहीत. वाहन चालवत असताना फोनवर बोलण्याचे प्रमाण देखील वाढ़त आहे. तसेच मद्यपान करून वाहने चालविली जात आहेत. या बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातात वाढ होऊ लागली आहे. यामुळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी बेशिस्तपणे वाहने चालविणाऱ्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशाप्रमाणे पोलीस उपायुक्त वाहतूक, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीवर कारवाईची धडक मोहीम सुरु केली आहे. यावेळी कारवाई दरम्यान पोलीस उपनिरीक्षक मनोज महाडिक यांच्यासह कर्मचारी व अधिकारी उपस्तित होते.



पनवेल परिसरातील महामार्ग, मुख्य चौकांमध्ये तसेच गजबजलेल्या ठिकाणी ही कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई सुरूच राहणार आहे, त्याचबरोबर कारवाईमुळे तरी नागरिकांमध्ये जागृती होईल व वाहन चालक हेल्मेट घालतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र पोलिसांना घाबरून किंवा कारवाई टाळण्यासाठी हेल्मेट न वापरता आपल्या स्वतःच्या जीवासाठी हेल्मेट घाला 


थोडे नवीन जरा जुने