नितीन पाटील यांचे पनवेल शिवसेनेच्या वतीने अभिनंदन

पनवेल दि. २१ (संजय कदम) : सामाजिक, राजकीय, कला आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन पाटील यांची उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीसपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल शिवसेना पनवेल महानगरप्रमुख व माजी नगरसेवक प्रथमेश सोमण यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. 


  
यावेळी शिवसेना पनवेल शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, शहर संघटक अभिजीत साखरे, उपशहर प्रमुख मच्छिंद्र झगडे, शाखाप्रमुख रमेश बेद, अभिनय सोमण व भरत जाधव उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने