लोकलमध्ये आढळला मृतदेह


पनवेल दि. २५ (संजय कदम) : बेलापुर रेल्वे स्टेशन वर आलेल्या पनवेल-वडाळा लोकलमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध पनवेल रेल्वे पोलीस करीत आहे


           या मयत इसमाचे अंदाजे वय 43 वर्षे, उंची 4 फूट 10 इंच, अंगाने सडपातळ, रंगाने काळा सावळा, चेहरा उभट, नाक सरळ, दात- शाबुत असून अंगात काळ्या व हिरव्या उभ्या रेषा चौकटी पांढ-या रंगाच्या मळकट असलेला फुल बाह्यांचा शर्ट व काळे रंगाची फुल पॅन्ट घातलेली आहे. सदर मयत इसमाचे अद्याप कोणीही वारस मिळून आलेले नाही. सदर इसमाबाबत काही माहिती उपलब्ध असल्यास पनवेल रेल्वे पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक डी.एस.बदाले मोबाईल क्र.९५९४९१२२९४ यांच्याशी संपर्क साधावा.
थोडे नवीन जरा जुने