लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू
पनवेल दि. २५ (संजय कदम) : खांदेश्वर ते पनवेल रेल्वे स्टेशन दरम्यान लोकलमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या महिलेच्या नातेवाईकांचा शोध पनवेल रेल्वे पोलिस करीत आहेत 


            सदर अनोळखी महिलेचे अंदाजे वय 55 वर्षे असून उंची 5 फूट 1 इंच, अंगाने मध्यम, नाक सरळ, डोक्याचे केस वाढलेले काळे पांढरे, डोळे काळे तसेच अंगात पिवळ्या व निळ्या रंगाची फिक्कट रंगाची साडी त्यावर गुलाबी हिरवा, निळ्या रंगाची फुले आहेत. या महीलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल रेल्वे पोलिस ठाणे दूरध्वनी क्र. 02227467122 किंवा सहा पोलीस उप निरिक्षक आर एस हाके (मो. 9494912294) यांच्याशी संपर्क साधावा.


थोडे नवीन जरा जुने