गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

पनवेल दि.२५ (संजय कदम) : पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्का रोडजवळील झाडाला कोणत्यातरी अज्ञात कारणावरून झाडाच्या फांदीला केबलच्या वायरने बांधून एका अनोळखी इसमाने गळफास घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.           सदर इसमाचे अंदाजे वय ४० वर्ष, रंग सावळा, उंची ५ फुट ७ इंच, डोक्यास वाढलेले काळे केस, चेहरा उभट, अंगात नेसुन पांढरा-निळया रंगाचा हाफ टी शर्ट, त्याच्या डाव्या बाजुस Fr. AGNEL MULTIPURPOSE SCHOOL AMBERNATH, ALWAYS EXCELLENCE अशा अक्षराचा लोगो असलेला, तसेच छातीवर M.S असे गोंदलेले आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस उपनिरिक्षक गणेश फरताडे यांच्याशी संपर्क साधावा.
थोडे नवीन जरा जुने