खेलो इंडियाचे प्रशिक्षण देण्यासाठी एचओसी स्कूलला मान्यता


पनवेल दि.२५ (वार्ताहर) : स्पोर्टस ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि स्मॉल खेलो इंडिया सेंटर संलग्नित क्रीडा केंद्रात अॅथलेटिक्स आणि व्हॉलीबॉल या खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी महात्मा एज्युकेशन संस्थेचे पिल्लई एचओसी इंटरनॅशनल स्कूल रसायनी रायगड या संस्थेला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार अॅथलेटिक्स आणि व्हॉलीबॉल खेळाला प्रोत्साहन देण्याचे उपक्रम स्पोर्टस ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि खेले इंडिया सेंटर सौजन्याने राबविण्यात येत आहे.            या योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी अॅथलेटिक्स आणि व्हॉलीबॉल या खेळाची निवड चाचणी दि. ३ आणि ४ मार्च २०२४ रोजी एचओसी इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर आयोजित केली आहे. तरी वयोगट १२ ते १६ ज्या मुला, मुलींना या खेळामध्ये विविध जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या प्रमाणपत्रासह सकाळी ८.३० वाजता कागदपत्रे घेऊन एचओसी इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर उपस्थित रहावे. असे आवाहन निवेदिता श्रीयंस यांनी केले आहे.


थोडे नवीन जरा जुने