मालगाडी खाली येऊन तरुणाचा मृत्यू
पनवेल दि. २५ (संजय कदम) : पनवेल रेल्वे स्थानकावर मालगाडी खाली येऊन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पनवेल रेल्वे पोलीस सदर इसमाचा नातेवाईकांचा शोध घेत आहेत.
         सदर तरुणाचे अंदाजे वय 30 वर्षे असून उंची 4 फूट 4 इंच, अंगाने सडपातळ, रंगाने काळा.
 सावळा, चेहरा उभट, नाक सरळ तर उजव्या हातावर कोप-याच्या खाली इंग्रजी मध्ये SAURABH असे गोधलेले आहे. तसेच अंगात निळ्या व पांढ-य् रंगाचा मोठ्या चेक्स असलेला बाह्यांचा शर्ट व काळे रंगाची फुल पेन्ट परिधान केलेली आहे. या इसमाबाबत किंवा त्याच्या नातेवाईकांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल रेल्वे पोलिस किंवा पोलीस हवालादार एस सी इंगवले (मो.9494912294) यांच्याशी संपर्क साधावा.
थोडे नवीन जरा जुने