कमोठ्यात महिला व मुलाला मारहाणकामोठे येथे पूर्व वैमान्यासाचा राग मनात ठेऊन एका महिलेला व तिच्या मुलाला मार हाण केल्याची घटना घडली असून संबंधित मुलावर धारधार शास्त्राने हल्ला केला गेला असल्याचे समोर येत आहे. या घटने नंतर परिसरात खलबल उडाली असून भाजपच्या एका कार्यकर्त्याकडून हा प्रकार घडला असून याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात सादर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे

.


कामोठे येथे भाजपचे पदाधिकारी असलेले हॅपी सिंग व त्यांच्या साथीदारांनी कामोठे येथे एका कार्यक्रमात झालेल्या वादावरून रोशन सुर्वे याला घरी मध्यरात्री घुसून त्याला व त्याच्या आईला जबर मारहाण करण्याची घटना घडली आहे. याप्रकारातून एकच खलबल उडाली आहे.
धारदार शस्त्र घेत विंग ड्रीम्स अपार्टमेंट सेक्टर ६ या सोसायटीमध्ये राहणाऱ्या रोशन व त्याची आई सीमा सुर्वे यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. यावेळी रोशन सुर्वे याच्या पाठीवरती वार करण्यात आला असून तो जाख्मि झालेला आहे. सध्या रोशनवर कळंबोली इथल्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील मूळ सूत्रधार असलेला हॅप्पी सिंग याला पोलीस पाठीशी घालात असून आम्हाला तात्काळ न्याय मिळावा अशी मागणि सुर्वे कुटुंबीय करत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी मारहाण करते आरोपी अजय मोरे, अमित जाधव, अजय पवार, अक्षय खरात व एका अनोळखी व्यक्तींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.थोडे नवीन जरा जुने