स्वर्गीय मितेश जोशी यांच्या स्मरणार्थ मोफत रुग्णवाहिका

पनवेल(प्रतिनिधी) तरुणांना प्रेरणा देण्याचे सामाजिक कार्य रवीशेठ जोशी यांच्या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी कामोठे येथे केले. स्वर्गीय मितेश जोशी यांच्या स्मरणार्थ कामोठेतील रवीशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेसाठी मोफत रुग्णवाहिका लोकार्पित करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचा लोकर्पण सोहळा आणि भजनी मंडळाला वाद्य साहित्य तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्था भेट देण्याचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कामोठे सेक्टर ३५ येथील श्री गणेश मंदिर येथे पार पडला.          या सामाजिक कार्यक्रमाला जेष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महानगर पालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष के.के. म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भगत, डॉ. अरुणकुमार भगत, दिलीप पाटील, विजय चिपळेकर, विकास घरत, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्मिता जाधव, भाजप नेते श्रीनंद पटवर्धन, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष तथा आयोजक रवी जोशी, पनवेल ग्रामिण संपर्क प्रमुख राजेश गायकर, भाऊ भगत, रवी गोवारी, युवा नेते हॅप्पी सिंग, युवामोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, जयेंद्र जोशी, सुशील शर्मा, तेजस जाधव, सचिन पाटील, रोशन भोपी, रोहन भोपी, रमेश तुपे, भटके विमुक्त आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा विद्या तामखेडे, दामोदर चव्हाण,
 पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, प्रदीप भगत, डॉ. सुभाष जाधव, स्वप्नाली म्हात्रे, डॉक्टर विनय जैसवाल, काकासाहेब कुतरवडे, आर. जी. म्हात्रे, महेंद्र भोपी, नितीन कवडे, मनोज कवडे यांच्यासह पदधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
         यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, स्वतःच्या दुःखातून सावरून कामोठे वासीयांसाठी आपण काय करु शकतो या भावनेने रवीशेठ जोशी काम करत आहे. त्यांचे हे कार्य तरुणांसाठी प्रेरणा देणारे असून सर्वाना सोबत घेऊन काम करण्याची कला त्यांच्यात आहे असे प्रतिपादन केले. तर भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रवीशेठ जोशी ट्रस्टच्या माध्यमातून रवी जोशी हे परिसरातील रहिवाश्यांना आपण काय सेवा देऊन शकतो यासाठी स्वतःला झोकून देत काम करत आहे. दुःखातून सावरत समाजासाठी मी अधिक काम करेन आणि या भावनेतून त्यांनी ही रुग्णवाहिका सेवा ही मोफत उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे इतरांचे दुःख हे आपले दुःख मानून रवी जोशी हे सामाजिक कार्य करतात याचा मला अभिमान वाटतो, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले. असे प्रतिपादन केले. रवीशेठ जोशी यांनी, आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून कामोठे वासीयांना मोफत रुग्णवाहिका सेवा आणि विविध साहीत्य वाटप माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रेरणेने केले असल्याचे सांगितले.थोडे नवीन जरा जुने