गटई कामगारांना परवाना व स्टॉल परवाना तातडीने द्या; माजी नगरसेवक शिवदास कांबळे यांची मागणी



पनवेल दि.०१ (संजय कदम) : गटारावर बसून आपला उदरनिर्वाह भागवणाऱ्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील गटई कामगारांना गटई कामगार परवाना व स्टॉल परवाना तातडीने द्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक रायगड भूषण डॉ शिवदास कांबळे यांनी गटई कामगारांच्या शिष्टमंडळासह पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. 



संत रोहिदास महाराज यांच्या विचाराने पावन झालेला चर्मकार समाज रस्त्यावरती बसून ऊन वारा पाऊस यांची जराही परवा न करता चप्पल दुरुस्ती करून आपला उदरनिर्वाह भागवत असतो. शासनाच्या वतीने या कामगारांसाठी गटई कामगार परवाना व स्टॉल परवाना ही शासन मान्य योजना लागू आहे. मात्र पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील गटई कामगारांना अद्याप याचा लाभ भेटलेला नाही. 


त्यामुळे तातडीने ही योजना चालू करावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक रायगड भूषण डॉ शिवदास कांबळे यांनी गटई कामगारांच्या शिष्टमंडळासह पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेतली. यावेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी तातडीने याबाबत कारवाईचे आदेश संबंधितांना देऊन हे धोरण लवकरच राबविण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. त्याचबरोबर चर्मकार समाजाचे थोर संत श्री रोहिदास महाराज यांची जयंती ५ फेब्रुवारी 2023 रोजी साजरी होत आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा शासनाच्या नियमानुसार संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.


थोडे नवीन जरा जुने