थाई-बॉक्सिंग फेडरेशन कपमध्ये खांदा कॉलनीतील खेळाडूंची चमकदार कामगिरी



पनवेल दि.०१ (संजय कदम) : गुवाहाटी आसाम येथे झालेल्या ९व्या राष्ट्रीय थाई-बॉक्सिंग फेडरेशन कप स्पर्धेमध्ये खांदा कॉलनी मधील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकांची लयलूट केली आहे. यामध्ये १९ वर्षावरील ६० किलो वजनगटात प्रथम नीलकंठ बहिरा याने सुवर्णपदक पटकावले आहे. २७ ते २९ जानेवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत प्रथम बहिरासह १४ वर्षाखालील मुलींच्या ५६ किलो वजनगटात पल्लवी अशोक कणसे आणि मुलांच्या गटात राजा लुकास नाडार या दोघांनीही सुवर्णपदक पटकावले आहे. 



खांदा कॉलनी युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्या शाखेत प्रतिक कारंडे यांच्याकडून हे खेळाडू कराटे आणि इतर मार्शल आर्टस् चे प्रशिक्षण घेत आहेत. विजेत्या खेळाडूंवर विविध स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत असून युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष आणि थाईबॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे चेअरमन डॉ. मंदार पनवेलकर, अध्यक्ष फरहान नबीजी आणि सचिव सागर कोळी यांनी विशेष कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 



थोडे नवीन जरा जुने