पनवेल विद्यमान महानगर बनले आहे. मात्र शेकडो वर्षांपासून इथे सर्वधर्मीय जनता एकोप्याने राहात आहे.सुमारे चारशे वर्षाची एकतेची परंपरा देणारे हजरत ख्वाजा पीर करीम अली शाह बाबा दर्गा उरूस हे देखील याची दिशा देणारे महत्वपुर्ण अध्यात्मिक केंद्र आहे.काल पनवेलच्या सर्वधर्मीय श्रद्धेला जपणाऱ्या हजरत ख्वाजा पीर करीम अली शाह बाबा दर्गा उरूसचे निशाण फडकावले गेले.
अल्पसंख्यांक मोर्चाचे भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर,पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने,उद्योजक बंदा नवाज मणियार,महाराष्ट्र शासनाचे हज समिती सदस्य शकील काझी, दर्गा उरूस उत्सव कार्यक्रमाचे वंशज तौफिक खांडे,सामनाचे पत्रकार संजय कदम,ट्रस्टी मझहर पठाण,रिझवाना दीदी,सुफियान मुकादम,बडेसाहब,आदी मान्यवर यावेळी सहभागी झाले होते.
सय्यद अकबर यांच्याहस्ते यावेळी पवित्र निशाण फडकावण्यात आले. पनवेलमध्ये आध्यत्मिकतेची मोठी परंपरा आहे. आजच्या विविध धर्म समाजाची घट्ट वीण त्यामुळे आहे.1747 साली हजरत पीर करमअली शाह चिशती नावाने या दर्ग्यांची स्थापना झाली होती. मुख्य महामार्गावर सुप्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिर, दर्ग्याजवळ गावदेवी मंदिर, अक्कलकोट स्वामी आश्रम, बल्लाळेश्वर व वीरूपाक्ष शिव मंदिरे, साईबाबा मंदिर अशी अनेक धार्मिक ठिकाणे सर्वांनाच एकमेकांच्या मनांत श्रद्धाभाव वाढवतात. पीर करमअली बाबांची कृपा महानगरावर आहे. सर्वधर्मीय लोकांची श्रद्धा यावर आहे. यावर्षी हा कार्यक्रम अधीक जाणीवपूर्वक सर्व समाजाला प्रेरणादायी होईल असा आमचा प्रयत्न राहील असे मत सय्यद अकबर यांनी मांडले.
Tags
पनवेल