काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : (३१/ १/२३), पावसाळा संपताच तालुक्यातील शेतकरी शेतामध्ये कडधान्य तसेच भाजी पाल्यांची लागवड शेतक-यांनी केली असून, ही शेती चांगली बहरली आहे.मात्र शेतात जंगलातले रानटी प्राणी यांची मोठ्या प्रमाणात भीती असते.शिवाय पक्षी हि शेतामध्ये पेरलेल्या कडधान्यांची नासधूस करत असतात.पूर्वी पासून शेताचे संरक्षण करण्यासाठी बुजागावने शेतात उभे ठेवत असल्यामुळे कडधान्य पिकांचे नुकसान टळले जाते.सातत्याने पिकांचे रक्षण करणे हे शेतक-याला शक्य नसते.तसेच शेतामध्ये पेरलेले कडधान्याने बहरल्याने त्यांच्या सुवासाने ,रानटी पक्षी ,प्राणी मोकाट गुरे शेतात प्रवेश करतात.त्यामुळे शेतक-याला मोठे नुकसान सहन करावे लागते.ते होऊ नये म्हणून शेतकरी शेतात बुजगावणे उभे ठेवत आहे.
बुजगावणने माणसाप्रमाणे दिसत असल्याने शेतात रानटी पक्षी ,प्राणी मोकाट गुरे प्रवेश करीत नाही.त्यामुळे शेतक-याला या बुजगावण्यापासून मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. शेतकरी शेतामध्ये वाल,मुग,हरभरे ,मटकी मका त्याचं बरोबर भाजी-पाल्याच्या समवेत कडधान्याला मागणी असल्याने शेतकरी ही दोन्ही पिके हिवाळा या ऋतू मध्ये घेत आहे.
शेतामध्ये शेतक-यांनी पेरलेल्या कडधान्याच्या सुवासाने शेतकर-यांची गुरे तसेच मोकाट गुरे शेतामध्ये प्रवेश करेव्त असतात,आणि पिंकाची नासधूस ही करतात.यामुळे शेतक-याला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागत असतो.शेतात जिवा पाड मेहनत करून अनेक प्रकारची पिके शेतकरी घेत असतो.सध्या शेतामध्ये लागवड केलेल्या भाजीपाला तसेच कडधान्ये उत्तम पिक आले,असून बाजार पेठेत चांगले मुल्य मिळत आहे. यामुळे घरचे भागवणे सोपे जात असते.शेतकरी शेतात खुप मेहनत करून जे काही पिक घेत असतो त्याच्यावर आपला कुटुंबाचा चरितार्थ चालत असतो.आपल्याला या माध्यमातून खुप उत्पन्न मिळत रहावे या उद्देशाने शेतकरी शेतात पिकांचे संरक्षण म्हणून बुजगावणे उभे करीत आहे.
Tags
पाताळगंगा