स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांवर होणारा अन्यायावर दि बा पाटील प्रकल्पग्रस्त ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष शशिकांत डोंगरे झाले आक्रमक
पनवेल दि.२८ (संजय कदम) : सिडकोकडून गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक ठेकेदारांवर अन्याय होत असून त्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदार संतापले आहे. त्यामुळे सदर प्रकार लवकरात लवकर थांबवा अशी मागणी दि बा पाटील प्रकल्पग्रस्त ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष शशिकांत डोंगरे यांनी महाराष्ट्र शासनासह सिडकोकडे केली आहे. 


यासंदर्भात दि बा पाटील संघटनेचे अध्यक्ष शशिकांत डोंगरे यांनी महाराष्ट्र शासनासह सिडकोकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, खारघर रेल्वे स्टेशनवर असलेले काही सिडको अधिकारी हे स्वतःचा आर्थिक लाभापोटी बाहेरील नॉन पिऐपी ठेकेदारांना कामे देतात. स्थानिक लोकांच्या निदर्शनास सदर कामे दिसून येवू नये म्हणून ही ठेकेदार लोक रात्री-बेरात्री सदरची कामे घाई- उरकुन घेतात, त्यामुळे सदर कामाचा दर्जाही निष्कृट आहे. यामध्ये नवी मुंबईचे ठेकेदार सुद्धा सहभागी आहे. सदर प्रकार हा प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करणारा आहे


. त्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदार संतापले असून असाच प्रकार चालु राहीला तर स्थानिक ठेकेदार सिडकोसमोर उपोषणास बसण्याच्या तयारीत आहे. तरी या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करावी किंवा इतरत्र बदली करावी अशी मागणी दि.बा. पाटील प्रकल्पग्रस्त ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे महानगर संघटक शशिकात डोंगरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सिडको व्यस्थापकीय संचालक, सह-व्यस्थापकीय संचालक, मुख्य अधीक्षक अभियंता व अतिरिक्त अधीक्षक अभियंता यांना या निवेदनाची प्रत सादर केली आहे. थोडे नवीन जरा जुने