मोरावे गावातील खेळाच्या मैदानाचे जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते झाला शुभारंभ .






उरण दि 20(विठ्ठल ममताबादे )
मोरावे गावातील नागरी सुविधांचा प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबित आहेत. या मध्ये गावाची स्मशानभूमी, खेळाचे मैदान, समाजमंदिर, पार्किंग, जिल्हा परिषद शाळेची इमारत इत्यादी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोरावे गावातील सर्व पक्षीय नेतेमंडळीनीं रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांना मोरावे गावातील नागरी सुविधा सोडविण्यासाठी साकडं घातले होते. त्याप्रमाणे महेंद्रशेठ घरत यांनी सिडकोचे एमडी डॉ संजय मुखर्जी यांच्या कडे मोरावे गावाला नागरी सुविधा मिळाव्यात तसेच सिडको प्रकल्पग्रस्त प्रत्येक गावांना त्या मिळाव्यात असे साकडं घातले होतेे



. त्यासाठी सिडको व्यवस्थापणा सोबत अनेक बैठका हि घेतल्या.सिडको एम डी संजय मुखर्जी यांनी त्यांच्या नियोजन विभाग, भुमी विभाग,सर्वेर विभाग,इंजिनियर विभाग यांना सुचना केल्या कि सिडको प्रकल्पग्रस्त गावांना नागरी सुविधा लवकरात लवकर देण्यात याव्यात अश्या प्रकारची सुचना सिडकोच्या या चारही विभागानां देण्यात आल्या आहेत.त्याप्रमाणे महेंद्रशेठ घरत यांनी शेलघर, गव्हाण, कोपर, धुतुम बामणडोंगरी या गावांना सुद्धा खेळाची मैदाने सोडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. या भागातील विकास पुरुष म्हणून त्यांची आज जण-माणसात ओळख आहे.






त्याच अनुषंगाने आज मोरावे गावासाठी सिडको कडून खेळाच्या मैदानाची जागा आरक्षित करण्यात आली आहे. त्या मैदानाचे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते आरक्षित मैदानाचे नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आले. यावेळी पनवेल तालुका कोळी समाज्याचे अध्यक्ष उत्तम कोळी, उलवे नोड भाजप अध्यक्ष मदन पाटील,ग्रामपंचायत सद्स्य वितेश म्हात्रे,शंकर पाटील,रामचंद्र पाटील, प्रणय कोळी, विनायक कोळी, धावजी पाटील, काशिनाथ म्हात्रे, कृष्णा भोईर, किरण म्हात्रे, विनय म्हात्रे, मिन्नाथ भोईर, विनय कोळी, चिंतामण गोंधळी,यशवंत ओवळेकर, मदन पाटील व मोरावे गावातील ग्रामस्थ मंडळी गावातील सर्व क्रिकेट युवक मंडळ मोठया संख्येने उपस्थित होते.मोरावे गावातील सर्व पक्षीय नेते मंडळींनी व क्रिकेट युवक मंडळानीं जिल्हाअध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे यावेळी आभार मानले.


थोडे नवीन जरा जुने