पर्यावरण वाचविण्यासाठी नदीतील प्रदूषण टाळा - खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी






काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : ९ फेब्रुवारी,  रायगड जिल्हाधिकारी, कर्जत विभागीय प्रांताधिकारी, खालापूर तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार कार्यालय खालापूर, पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट व पिल्लेज् महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारत देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव अंतर्गत "चला जाणूया नदीला" या अभियानाची जनजागृती मोहीम शिबीर रसायनी मधील पिल्लेज् महाविद्यालयात पार पडले असून हा शिबीर पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण जाधव यांच्या मुख्य आयोजनातून संपन्न झाले तर यावेळी विद्यार्थ्यांना तहसीलदार आयुब तांबोळी व अन्य उपस्थित मान्यवरांनी नदीचे महत्त्व पटवून देत अनेक उदाहरण दिली.



                       यावेळी तहसीलदार आयुब तांबोळी यांनी आपले मत मांडताना म्हणाले की, पर्यावरण वाचविण्यासाठी नदीतील प्रदूषण टाळणे गरजेचे असून विद्यार्थी मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनातील प्लँस्टीकचा वापर कमी करा तसेच नदीचे महत्त्व जाणून घेत नदीतील प्रदुषण कमी करण्यासाठी आपआपल्या परिने जनजागृती करावी, जर कोणालाही या संदर्भात मदत लागल्यास तहसील कार्यालयात संपर्क साधावा व ती मदत करण्यास खालापूर तहसील कार्यालय पुढाकार घेईल असे मत तहसीलदार तांबोळी यांनी व्यक्त केले.



              याप्रसंगी खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी, रसायनीचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षा उमाताई मुंढे, सह अभियंता एमआयडीसी पाताळगंगा विठ्ठल पाचपुंडे, प्रिया असोसिएशन पाताळगंगा अध्यक्ष सुनील कदम, रुची सोया पतंजलीचे संजीव बनोट, पिल्लेज् महाविद्यालय प्राचार्य लता मेनोन, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अभिजित लोहीया, व्ही आर मेटेल प्रा.लि.चे विपीन चौव्हान, माजगावचे माजी उप सरपंच राजेश पाटील, युवा कार्यकर्ते अमित देवघरे, 
पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण जाधव आदीप्रमुखासह मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.



    

थोडे नवीन जरा जुने