पनवेल दि. २१ ( वार्ताहर ) : पनवेल महानगरपालिकेचे माजी आरोग्य निरीक्षक,म्यूनसिपल लेबर युनियनचे माजी अध्यक्ष,कोयना क्षत्रिय मराठा समाज सेवा संघाचे माजी अध्यक्ष तसेच संचालक दि.पनवेल अर्बन बँक ली. दिलीप कदम यांच्या मातोश्री ह.भ.प.वै.श्रीमती पार्वतीबाई शंकरराव कदम यांचे वयाच्या ८७ व्यां वर्षी वृध्पकाळाने निधन झाले.
त्यांनी ३५ वर्षापूर्वी पासुन वारकरी संप्रदायाचा स्वीकार केला होता. त्यांच्या उत्तम संस्कारामुळे त्यांचे पुत्र दिलीप कदम, विनोद कदम व मुलगी सौ.उषा शिंदे यांचा परिवार पारमार्थिक व सामाजिक कामात जोडला गेला आहे.त्या धरणाकॅम्प करंजावडे गावातील गाविक,पारमार्थिक कामांमध्ये महत्वाच्या मार्गदर्शक होत्या.
Tags
पनवेल