मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली मध्ये मायरा हेल्थ केअर, सिद्धिविनायक हाॅस्पिटल व शिल्पा मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर






पनवेल दि.०९(वार्ताहर): कळंबोली येथील मायरा हेल्थ केअर, सिद्धिविनायक हाॅस्पिटल व शिल्पा मेडिकल 
यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्र एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालय,कळंबोली या ठिकाणी जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते.याशिबिराचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन झाले.
         साधेपणाने समाज उपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवहानाला प्रतिसाद देत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी हार,तुरे व बॅनबाजीला फाटा देत आरोग्य शिबिराचे आयोजन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा केला. या निमित्त आरोग्य शिबीरा मध्ये सामान्य शारिरिक सपासणी,बालरोग स्त्रीरोग तपासणी,मधुमेह रूग्णांना विशेष मार्गदर्शन तसेच सी.बी.सी, शुगर, बी.पी, वजन,ऊंची,बीएमआय. 



इत्यादी तपासण्या करण्थात आल्या व मोफत औषधे देण्यात आली. या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने पनवेल चे आमदार प्रशांत ठाकूर यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली, अत्यंत कमी वेळात अतिशय सुंदर उपक्रम राबविण्यात आला या बद्दल रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे आणि सर्व पदाधिकारी यांचे कौतुक केले. मोफत आरोग्य तपासण्या सर्वसामान्य नागरिकांना भेटणे विषयी सुंदर काम कोणतेही नसून या अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. असे प्रतिपादन केले या वेळी प्रतिष्ठान चे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.




 या आरोग्य शिबिरात शेकडो लोकांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे दिली.या आरोग्य शिबिरासाठी सिद्धीविनायक हाॅस्पिटलचे डाॅ.संजय कदम, डाॅ. पल्लवी कदम व शिल्पा मेडिकल चे विवेक शिंदे यांचे सहकार्य मिळाले, सदर चे शिबीर यशस्वी करण्यासाठी ऑड.श्रीनिवास क्षीरसागर, रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके बाळासाहेबांची शिवसेनेचे कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, निलेश दिसले, संजय शेडगे, महेश गोडसे, संभाजी चव्हाण, आबा लकडे, नाना मोरे, सागर मोरे, नारायण फडतरे, नितिन गुलदगड, इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते



थोडे नवीन जरा जुने