खारघर रेल्वेस्थानक परिसरात अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर वाहतूक शाखेची कारवाई

पनवेल दि.२५ (वार्ताहर) : खारघर रेल्वेस्थानक परिसरात रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर वाहतूक शाखेने कारवाई केली आहे. खारघर वाहतूक शाखा आणि वाहतूक पोलिस उपायुक्त यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत १०५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.            खारघर रेल्वे स्थानकापासून सेक्टर ८ मध्ये रस्त्याच्या दुतर्फा सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने अनधिकृत पार्क केली जात आहेत. वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत हजारो रुपयांचा दंड जमा झाला आहे. ई-चालानद्वारे ही कारवाई करण्यात आली. विशेष मोहीम राबवत ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश गावडे यांनी दिली.


थोडे नवीन जरा जुने