पाताळगंगा : १७ फेब्रुवारी, आज प्रत्येक मुली सुरक्षित असल्या पाहिजे त्यांच्यावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये.शिवाय एखादा प्रसंग निर्माण झाल्यास आपण स्व संरक्षण करुन त्या संकटापासून कसे बचावले पाहिजे यासाठी खालापूर सायबर पोलीस आणी टाटा स्टील फाउंडेशन यांचे संयुक्त विदयमाने यांच्या माध्यमातून श्री छत्रपती विदयालय व ज्युनीयर कॉलेज वावोशी येथे विद्यार्थींना मपोसई सरला काळे व मपोना लतिका गुरव यांनी हायस्कुलचे मुलींना बडी कॉप, पोलीस काका, दामीनीपथक, डायल ११२ या बाबत माहीती देवून त्यांचे मनोबल वाढविले.
यावेळी महिला अत्याचार, बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार, गुड टच बॅड टच याबाबत मार्गदर्शन करून सायबर जनजागृती करण्यात आली.यावेळी विद्यार्थींना पोलीस अधिकारी महिला यांचे नाव तसेच संपर्क क्रमांक देण्यात आले.यावेळी मुलीनी स्वताचा बचाव करण्यासाठी तपस्वी गोंधळी मॅडम कराटे प्रशिक्षक, राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी यांचेकडुन मुलींना प्रात्यक्षिकाद्वारे कराटे व स्व संरक्षणाचे धडे देण्यात आले.
स्व संरक्षण मार्गदर्शन शिबीरासाठी टाटा स्टील फाउंडेशनचे व्यवस्थापक भावेश रावल, कु.तेजल पाटील, खालापुर पोलीस ठाणेचे मपोसई सरला काळे, मपोह/हेमा कराळे, मपोना/लतिका गुरव, पोशि/समिर पवार यांचेसह ३५० शालेय मुली, शिक्षकवृंद उपस्थित अदि उपस्थित होते.
Tags
पाताळगंगा