परिणिता सोशल फाऊंडेशनने आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल मध्ये प्रथमच







पनवेल दि.०८(संजय कदम): परिणिता सोशल फाऊंडेशन आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल मध्ये प्रथमच महिला उद्योजिकांचे गृहपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन पनवेल शहरातील गोखले हॉल मध्ये आयोजित करण्यात आला आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन मा सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याहस्ते आज झाले.



           या प्रदर्शनाच्या उदघाटनावेळी नवी मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, परिणीता सोशल फाउंडेशनचे संस्थापक प्रशांत सागवेकर, संस्थापिका साक्षी सागवेकर, परिणीता सोशल फाउंडेशनच्या महाराष्ट्र्र कोअर टीम लीडर नंदिनी पंडित, टीम लीडर स्मिता जोशी, लायन्स क्लब पनवेल अध्यक्ष हेमंतसिंग ठाकूर, लायन्स क्लबचे सुयोग पेंडसे, सुरभी पेंडसे, समाजसेविका सुहासिनी केकाणे यांच्यासह पदाधिकारी, आणि मान्यवर उपस्थित होते. दोन दिवसीय प्रदर्शनात विविध प्रकारच्या साड्या, ज्वेलरी, लखनवी कुर्ता, वेस्टर्न वेअर, ट्रॅडिशनल किड्स वेअर, पूजा साहित्य, आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स, टपर वेअर, रेडीमिक्स प्रॉडक्ट्स, कोकण प्रॉडक्ट्स, श्रीखंडच्या विविध व्हरायटीज, कॉपर हाऊस यांसह इतर अनेक गृहपयोगी वस्तू खरेदी व विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.


 तरी महिला भिगीनींनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन परिणीता सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका साक्षी सागवेकर यांनी केले आहे. यावेळी मा.सभागृहनेते परेश ठाकूर म्हणाले की, परिणिता फाऊंडेशने आयोजित केलेलं हा सर्वपूर्ण अश्या प्रकारचे हे प्रदर्शन आहे. या माध्यमातून महिला उद्योजकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्यामुळे आगामी काळातही त्यांनी असेच उपक्रम राबवून महिलांना प्रोत्सहन द्यावे असे आव्हान केले. 




थोडे नवीन जरा जुने