पाताळगंगा : ९ फेब्रुवारी, नविन वर्षातील दुसरी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे दर वर्षी प्रमाणे माजगांव,आंबिवली गावातील तरुण, युवक पायी दिंडी पालखीचे आयोजन करण्यात आले.सकाळी विठ्ठल रखुमाई च्या मंदिरातून निघालेली पायी पालखी अनेक ग्रामस्थांनी या पालखीत विराजमान झालेल्या गणपतीचे दर्शन घेतले.त्याच बरोबर ह्या पायी पालखीचे ठीक - ठिकाणी स्वागत करून अल्प अहार देण्यात आले.
मुंबई पुणे महामार्गावर हे अष्टविनायका पैकी असेलेले महड गावातील वरद विनायक यांचे दर्शन घेण्यासाठी पायी दिंडी पालखी चे आयोजन करण्यात आल्यामुळे यामध्ये तरुण वर्ग लहान मुळे या सहभागी झाले होते.मुखात गणेशांचे नामस्मरण आणी हातात टाळ ,मृदुंग च्या गजरात मजळ - दर मजळ करीत ही पालखी गणेशांच्या चरणी नतमस्तक झाली.
आपल्या वर कोणतेही संकट येवू नये,तसेच आल्यावर त्या संकटापासून सर्वांचे रक्षण करावे सर्वांना सुखी ठेवावे.असे साकडे यावेळी गणराला घालण्यात आले.गेली सहा वर्ष सातत्याने नविन वर्षाच्या येणाऱ्या पहिल्या संकष्टी चतुर्थीला माजगावातील महड येथिल असलेल्या वरद विनायकांचे दर्शन घेत असतात.ही परंपरा सुरुच राहवी या उद्दात विचारांतून या पालखीचे आयोजन करण्यात आले.
Tags
पाताळगंगा