जेष्ठ निरुपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, सदस्यांनी फटाके फोडून जल्लोष






काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : ८ फेब्रुवारी, जेष्ठ निरुपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर होताच रायगड समवेत संपूर्ण महाराष्ट्रातल्या श्री सदस्यांनी फटाक्यांच्या अतिषबाजी करुन आपला आनंद साजरा केला.धर्माधिकारी कुटुंब हे मूळ रायगड जिल्ह्यातल्या रेवदंडा गावच चारशे वर्षांपूर्वी या घराण्यातील गोविंद चिंतामणी सांडेल्य यांनी धर्म जागृतीचं काम केलं त्यांच्या कामावरून कान्होजी आंग्रे यांनी त्यांना धर्माधिकारी ही उपाधी दिली धर्माधिकारी ही उपाधीच पुढे या घराण्याचा आडनाव झालं. त्यानंतरच्या पिढ्या धर्मजागृतीचं हे काम करतच आहे. 



            डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या माध्यामातून प्रत्येक ठिकाणी बैठकीच्या माध्यमातून निरूपण देण्यांचे काम सातत्याने सुरु आहे.त्याच बरोबर विविध सामाजिक उपक्रम या प्रतिष्ठान च्या माध्यमातून राबविले गेले आहे.तालुक्यात वृक्ष संवर्धन कार्यक्रम सातत्याने सुरुच असून या माध्यमातून विहिरी स्वच्छता मोहीम,रस्ते स्वच्छता, आरोग्य शिबीर,रक्तदान शिबीर,असे विविध उपक्रम गेले अनेक वर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात आले आहे.



           श्री समर्थ बैठकीच्या माध्यमातून निरूपण देवून लाखो श्री सदस्याच्या सुखी झाले आहेत.समाज्यामध्ये पसरलेली अंधश्रद्धा ही मुळापासून उपटून टाकण्यांचे काम डॉ.नानासाहेब धर्माधिकारी आणी आता आप्पासाहेब धर्माधिकारी,सचिन दादा धर्माधिकारी कुटुंब करीत आहे.श्रवणांच्या माध्यमातून माणूस घडला जातो या उद्दात विचारांतून आजही खेडो पाड्यात बैठकी सुरु आहे.आणी त्यांची पोच पावती म्हणून त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहिर झाला यामुळे श्री सदस्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


थोडे नवीन जरा जुने