पनवेल दि.१३ (वार्ताहर): राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे खांदा कॉलनीमध्ये मोफत सर्व दाखले वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला बाळासाहेबांची शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनी भेट उपक्रमाचे कौतुक केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन बाळासाहेबांची शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले होते. त्यानुसार खांदा कॉलनी सेक्टर सात येथील श्री गणेश दुर्गामाता माता मंदिरात खांदाकॉलनी शहराचे शहर प्रमुख शिवाजीराव थोरवे यांनी दाखले वाटप शिबीराचे आयोजन केले होते.
या शिबिराला नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात डोमेसाइल, उत्पन्नाचा दाखल, नॉन क्रीमीलेयर, जात प्रमाणपत्रांचे वाटप, तसेच रेशन कार्डातील पत्ता बदलणे, नाव कमी आणि वाढवणे यांसारखी कामे करण्यात आली. २०२३-२४ शाळा शाळा प्रवेशाकरिता एक लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या धारकांचा आर.टी.ई शाळा प्रवेशाचा फॉर्मही यावेळी भरण्यात आला. बाळासाहेबांची शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनी भेट देत हा दाखले वाटप शिबीराचा उपक्रम राबवल्याबद्दल शिवाजीराव थोरवे यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.
Tags
पनवेल