बळीराम म्हात्रे यांचे अल्पशा आजाराने निधन.


 उरण दि 24 (विठ्ठल ममताबादे ) शेतकरी कामगार पक्षाचे एकनिष्ठ व कट्टर कार्यकर्ते तथा उरण तालुक्यातील कडापे येथील सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक बळीराम भरत म्हात्रे( वय वर्ष 75 ) यांचे शनिवार दि 18/02/2023 रोजी अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले आहे.गोरगरिबांना अडीअडचणीत मदत करणारे सर्वांच्या सुख दुखात सहभागी होणारे 


व्यक्तिमत्व म्हणून ते सुपरिचित होते. त्यांच्या पश्चात 2 मूले, 1 मूलगी,2 नातवंडे, जावई असा त्यांचा कुटुंब परिवार आहे.कै. बळीराम म्हात्रे यांच्या अल्पशा निधनामुळे म्हात्रे कुटुंब व कडापे, आवरे येथील ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे.कै बळीराम म्हात्रे यांचे उत्तर कार्यविधी बुधवार दि 1/3/2023 रोजी त्यांच्या राहत्या घरी कडापे येथे होणार आहे. कोणत्याही प्रकारचे दुखवटे स्विकारले जाणार नाही असे त्यांच्या कुटुंबियांमार्फत कळविण्यात आले आहे.


थोडे नवीन जरा जुने