श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख श्री गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या 68 व्या अभीष्टचिंतनानिमीत्त विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन


श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख श्री गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या 68 व्या अभीष्टचिंतनानिमीत्त विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन पनवेल दि.२१(संजय कदम): दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख श्री गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या 68 व्या अभीष्टचिंतनानिमीत्त दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ नवीन पनवेल केंद्रातर्फे प.पु. गुरुमाऊलींना दीर्घायुष्य तसेच सुआरोग्य


आरोग्य लाभावे या साठी पनवेल शहरातील विविध मंदिरांमध्ये सेवा घेवून प्रार्थना करण्यात आली. 
     पनवेल मधील पुरातन विरुपाक्ष मंदिर, खांदेश्वर मंदीर, हनुमान मंदिर- पोदी, शितला माता मंदिर, ईच्छापूर्ती गणेश मंदिर, बालाजी मंदिर या ठिकाणी विविध सेवांचे नियोजन करण्यात आले होते. पापमोचनी एकादशीच्या दिवशी प.पु. गुरुमाऊलींच्या अभीष्टचिंतनच्या दिवशी श्री बालाजी मंदिर येथे विशेष लक्ष्मी नारायण याग आणि महामृत्युंजय यागाचे नियोजन केले होते त्यामधे शेकडो सेवेकरी सहभागी झाले होते.

 

थोडे नवीन जरा जुने