8 मार्च 2023 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भावना कैलास म्हात्रे माजी सरपंच खोपटे यांच्या नेतृत्वाखाली मंगळागौरी महिला बचत गट व जास्वंदी महिला बचत गट यांनी उरण तालुक्यातील खोपटे गावातील नानानानी पार्कची साफसफाई करून स्वच्छता अभियान राबवून व स्वच्छतेचा संदेश देत महिला दिन साजरा केला.
या स्वच्छता अभियानात रंजना म्हात्रे, प्रणिता म्हात्रे , हिरावती म्हात्रे , जयश्री म्हात्रे, जागृती म्हात्रे,प्रगती म्हात्रे,सुनीता म्हात्रे,कल्पना म्हात्रे,दिपाली ठाकूर, कु.स्विटी यांनी खुप मेहनतीने सर्व बाटल्या डिश पालापाचोळा व कचरा जमा करून व टँकरच्या पाण्याने सर्व रस्ता व सभागृह स्वच्छ केले.
केलेल्या स्वच्छतेच्या कामाचे समाधान सर्व महिलांच्या चेहर्यांवर आनंदच्या स्वरूपात दिसत होते.स्वच्छता अभियान राबवून महिलांनी चांगल्या उपक्रमांचे आयोजन केल्याने त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Tags
उरण