द्रोणागिरी शिवसेना शहर शाखे तर्फे महिला दिन साजरा.






उरण दि 9(विठ्ठल ममताबादे )6 मार्च ते 10 मार्च दरम्यान द्रोणागिरी नोड येथे द्रोणागिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या महोत्सव दरम्यान द्रोणागिरी शिवसेना शहर शाखेतर्फे द्रोणागिरी नोड 50 येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


 या प्रसंगी विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन सुरेखा भोईर,अंकिता घरत,बेबी ठाकूर, यांनी केले कार्यक्रमास उपस्थिती वैशाली सुतार महिला संघटिका नवीन शेवा,सविता नितीन मढवी सरपंच नवघर,प्रियदर्शनी अविनाश म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य नवघर, ग्रा.प. सदस्य नवीन शेवा मयुरी घरत,वैशाली म्हात्रे,भावना भोईर, प्रणिता भोईर नंदा नोले महिला शाखाप्रमुख ४८,हर्षा जीवन घरत, ग्रामपंचायत सदस्य फुंडे,रूचिता प्रितम म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य फुंडे,


जुईली विश्वजीत घरत, ग्रामपंचायत फुंडे,निता सागर घरत, शुभांगी भोईर, सविता सुतार, सुरेखा कोंढाळकर, अध्यक्ष गृहसेविका शोभा घेरडे, बचत गट प्रमुख सेक्टर ५० सुजाता कुळाल, बचत गट प्रमुख सेक्टर ४८ वीर मॅडम उपसंघटिका सेक्टर ४८ संध्या पाटील,सुप्रिया शिंदे, स्वाती चव्हाण आदी 200 हुन अधिक महिला मान्यवर यावेळी उपस्थित होत्या.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन दर्शना माळी यांनी केले.


थोडे नवीन जरा जुने