प्रिया इव्हेंट्स तर्फे महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी


पनवेल दि,.०९ (संजय कदम): पनवेल मधील प्रिया इव्हेंट्स तर्फे महिला दिनाचे औचित्य साधून खास महिला दिनानिमित्त ‘पैठणी’ जिंकण्याची एक सुवर्णसंधी आली आहे.


     शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३ वेळ दुपारी ४.०० वा, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे हास्यजत्रा फेम अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांच्या उपस्थितीत खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम सुप्रसिद्ध गायक व निवेदक हरीश मोकल यांच्या मार्फत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची तिकीट विक्री बुक माय शो आणि फोन बुकिंग सुरु झाली आहे. तिकीट साठी संपर्क - मंदार काणे ९७६९५१५६५९ (गूगल पे उपलब्ध आहे). तरी याचा जास्तीत जास्त महिलांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.थोडे नवीन जरा जुने